
चिपळूण: चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील तरूणाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला आहे. समीर आत्माराम सावरटकर (४०) असे त्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर सावरटकर हा सोमवार दि. २७ मार्च रोजी सकाळी पेढे येथील आपल्या बहिणीकडे गेला होता. बहिणीला भेटल्यानंतर तो चालत रेल्वे रूळ ओलांडत असता अचानक आलेल्या रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. फरशी तिठ्याजवळ हा अपघात घडला.
येथील नागरिकांनी रेल्वे रूळावर कुणी पडल्याचे लक्षात आल्यावर चिपळूण पोलिसांना खबर देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह रेल्वे रूळावरून बाजूला केला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला अधिक तपास पोलीस करीत आहेत.
