गुहागर तालुक्यातील अडूर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

गुहागर- रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अडूर पड्याळवाडीतील २९ वर्षीय तरुणाने ११ मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अडूर पड्याळवाडीतील अनिकेत सुभाष नार्वेकर (वय २९) या तरुणाने गुरुवारी, ११ मे रोजी रात्री १. ४५ नंतर राहत्या घरातील त्याच्या शयनकक्षात गळफास लावून आत्महत्या केली. १२ मे रोजी सकाळी ६ च्या दरम्यान अनिकेतला उठविण्यासाठी घरच्या मंडळींनी हाक मारली. मात्र खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून अनिकेतच्या शयनकक्षाला असलेली खिडकी उचकटून त्याचा लहान भाऊ अक्षय खोलीत शिरला. तेव्हा सिलींग फॅनला लाल रंगाच्या ओढणीने गळफास लावून अनिकेतने आत्महत्या केल्याचे सर्वांच्या लक्षात आले.
याबाबतची माहिती अनिकेतचा लहान भाऊ अक्षय नार्वेकर याने गुहागर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत नार्वेकर चालक म्हणून काम करीत असे. मित्रांकडून वारंवार किरकोळ रक्कम उधारीवर घेण्याची त्याला सवय होती. तसेच दारु पिण्याचेही व्यसन होते. तणावाखाली येवून अनिकेतने आत्महत्या केली असावी असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेचा अधिक तपास गणेश कादवडकर करीत आहेत. दरम्यान हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर अनिकेतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या दरम्यान अडूरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतच्या घराजवळच श्री पड्याळदेव मंदिरात सत्यनारायणाची महापुजा आणि पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनिकेतच्या आत्महत्येमुळे पड्याळवाडीवर शोककळा पसरली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page