
देवरुख : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना देवरूखनजिकच्या साडवली एकतानगर येथे घडली. राजेंद्र दत्ताराम मणचेकर (२९) असे मृत तरूणाचे नाव आहे.
राजेंद्र मणचेकर हा मामासह शनिवारी रात्री ९.३० वाजता घरापासून नजिक असलेल्या सप्तलिंगी नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेला होता. खेकडे पकडत असताना राजेंद्रचा पाय घसरून तो थेट नदीपात्रात कोसळला व त्याचा बुडून मृत्यू झाला