रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे मच्छिमारी करण्यासाठी गेलेला तरूण बुडाला.
प्रवेश प्रभाकर पावसकर (३२, रा. पावस खारवीवाडा) रविवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास प्रवेश याचा मृतदेह नाटे समुद्रकिनारी स्थानिक रहिवाशांना आढळून आला. या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात झाली आहे.
प्रवेश हा १७ मार्च २०२३ रोजी मासेमारीसाठी समुद्रामध्ये गेला होता. या घटनेची खबर प्रभाकर रामा पावसकर यांनी पोलिसांत दिली होती. दरम्यान १९ रोजी दुपारी नाटे येथे प्रवेश याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
जाहिरात