
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गुरववाडी येथील खंडाळा ते वरवडे या मुख्य मार्गावरील उतारावर बैल आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटून झालेल्या अपघातात खाली पडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
मनोज महादेव शिवगण (३२, मुळ रा. मालगुंड, शिवगणवाडी, सध्या रा. प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा वसाहत, रत्नागिरी) असे या तरूणाचे नाव आहे. मनोज शनिवारी सायंकाळी ७.१५ वा. च्या दरम्यान आपल्या मालकीची दुचाकी घेवून वरवडे ते खंडाळा या मुख्य मार्गाने येत होता. वरवडे गुरववाडी येथील उतारावर रस्त्याच्या उजव्या बाजूने बैल आडवा आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या द्यिुत खांबावर जावून तो आादळला. तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या गटारात जावून पडली. यात मनोज हा जखमी झाला. यावेळी वरवड गावचे पोलीस पाटील विजय जोशी हे आपल्या कामानिमित्त खंडाळा येथे जात असताना त्यांना मनोज शिवगण हा पडलेला दिसला.
त्यांनी तत्काळ वरवडे येथीलच असलेल्या साहिल पालशेतकर यांच्या चारचाकी वाहनाने मनोजला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे नेले. तेथील डॉक्टरांनी मनोजवर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सायं. ७.४५ वा. तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
जाहिरात
