
खोदडे ; आबलोली : काम करताना हातातील लोखंडी सळीचा वीजववाहिन्यांना स्पर्श झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आबलोली येथे सोमवारी घडली. या घटनेची फिर्याद स्वप्नील देसू राठोड (विजापूर, कर्नाटक, सध्या रा. आबलोली) याने गुहागर पोलीस ठाण्यात दिली.
आबलोली पेट्रोल पंपाजवळील गटाराचे काम सुरू आहे. यावेळी स्वप्नील राठोड व रवि रामू राठोड (४०) हे दोघे काम करत होते. गटारावर स्लॅब टाकण्यासाठी लागणार्या लोखंडी सळ्या कटींग करण्याचे काम सुरू होते. यातील एक सळी रवि राठोड याने वरच्या दिशेकडे केली असता तेथील घराशेजारी असणार्या विजेच्या लोखंडी खांबावरील वीज वाहिनीला लागल्याने तो विजेच्या धक्क्याने जागीच पडला. यावेळी इतर कामगारांनी राठोड याला आबलोली सरकारी दवाखान्यात नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले.

जाहिरात

