गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले

Spread the love

🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज

🛑 रत्नागिरी | जानेवारी ३१, २०२३.

◼️ तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी कोल्हापूर येथून आलेल्या महिला समुद्रात बुडली. दरम्यान, तिला सुखरूप बाहेर काढण्यात जीवरक्षकांना यश आले. सौ. प्रियंका बालाजी सपाटे (वय ३० वर्षे, मंगळवारपेठ, कोल्हापूर) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना दि. ३० रोजी दुपारी घडली.

◼️ याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी ०१:०० वाजता समुद्रात स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने महिला गटांगळ्या खाऊ लागली. ही बाब जवळच असणाऱ्या त्यांच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. जीव रक्षकांनी पोलीस व मोरया वॉटर स्पोर्टच्या मदतीने बुडणाऱ्या महिलेला पाण्याबाहेर काढण्यात आले.

◼️ त्यानंतर रूग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. गणपतीपुळे ग्रामपंचायत, जीवरक्षक गणपतीपुळे, पोलीस नाईक प्रशांत लोहळकर, पोलीस शिपाई सागर गिरी गोसावी, मोरया वॉटर स्पोर्टस् यांनी विशेष मेहनत घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page