स्वातंत्र्यदिनानिमित्त संगमेश्वर मध्ये अनोखा उपक्रम..

Spread the love

संगमेश्वर : – देशाच्या अमृत महोत्सवी पर्व सुरू असताना तसेच मेरी मिट्टी मेरा देश अभियान सध्या संपन्न झाले असताना 77 व्या स्वातंत्र्यदिनी संगमेश्वर नावडी पागाळी येथील कोकाटे सभागृहात देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

 यावेळी व्यासपीठावर मान्यवर सरपंच सौ प्रज्ञा कोळवंणकर, ब्रह्मकुमारी माधवी बहन जी,निहाली गद्रे,ग्रामपंचायत सदस्य सौ.योगिनी डोंगरे, गायिका समीक्षा वाडकर,  सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चिता कोकाटे (शेट्ये )सामाजिक कार्यकर्ते विशाल रापटे आदी उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दिनेश अंब्रे यांनी केले.भारताच्या स्वातंत्र्यासाठी सीमेवर आपल्या प्राणाची आहुती बलिदान देणारे, वीर योध्ये, स्वातंत्र्य सैनिक, माझी सैनिक व राष्ट्रभक्त अशा शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत अर्चिता कोकाटे यांनी गुलाब पुष्प देऊन केले.

सानवी देवरुखकर,युगा कोळवंणकर, कल्पक बिरजे, जाई कदम, नेत्रा सुतार, रिद्धी देवल यांनी आपल्या सुस्वर गायनाने देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

https://fb.watch/mtNr810VLm/?mibextid=CDWPTG

मान्यवरांच्या हस्ते गायन कलेतील उगवत्या ताऱ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित पालक वर्ग व विद्यार्थी यांना गायनातील गुरु निहाली गद्रे यांनी विशेष मार्गदर्शन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राजयोगिनी माधवी बहनजी यांनी ” ज्ञानाचे अनमोल मोती व दैवी गुण” याची जोपासना करण्याचे आपल्या मौलिक विचारातून सांगितले.

ए मेरे वतन के लोगो, ओ देस
मेरे तेरी शान पे सदगे, जयोस्तुथे अशी सुंदर गीत मुलांनी गायले.
सूत्रसंचालन व आभार सौ.अर्चिता कोकाटे मॅडम यांनी केले.

हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते श्री संजय धोंडू शिंदे (कोंड असुरडे ), श्री. दिनेश आंब्रे व सौ. अर्चिता कोकाटे यांनी आयोजित केला होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page