देवरुखमध्ये महसूल विभागाने जप्त केलेला ट्रक चोरून नेला; मालकावर गुन्हा दाखल…

Spread the love

*संगमेश्वर :* तालुक्यातील देवरुख येथे महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेला तब्बल १९ लाख रुपयांचा ट्रक चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक मालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेला ट्रक अधिक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्याच्या उद्देशाने शिवाजी चौकाजवळ उभा करण्यात आला होता, मात्र तोपर्यंत आरोपीने तो पळवून नेला.

ही घटना १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० ते १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० या वेळेत घडली. आरोपी शरणबसप्पा धरमण्णा तळवार (रा. कलंहागरगा, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याने हा गुन्हा केल्याचा आरोप आहे.

मंडळ अधिकारी विलास यशवंत हिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपीचा १४ टायर ट्रक (क्र. KA-32 D-6134) लांजा-दाभोळे रस्त्यावर सकमवाडीजवळ जांभ्या दगडाने ओव्हरलोड भरलेल्या स्थितीत आढळला होता. महसूल विभागाने या ट्रकावर कारवाई केली आणि पुढील प्रक्रियेसाठी तो जप्त करून देवरुख येथील शिवाजी चौकाजवळ वडाच्या पाराजवळ उभा केला होता.

जप्त केलेल्या ट्रकमध्ये ५.७२ ब्रास जांभा दगड होता, ज्याची किंमत १७,१६० रुपये आहे. तसेच, ट्रकाची अंदाजे किंमत १९ लाख रुपये आहे. महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या या ट्रकला कोणतीही परवानगी नसताना, आरोपी तळवार याने तो लबाडीच्या इराद्याने चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच १९ सप्टेंबर २०२५ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी कलम ३७९ (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. महसूल विभागाच्या ताब्यातून ट्रक चोरीला गेल्याने प्रशासकीय कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page