
अधिक महिती अशी की, केए २३ ए ६६९४ हा ट्रक आज सकाळी कर्नाटकातून जयगड बंदराकडे साखर घेऊन जात होता. हातखंबा येथील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक बाजूच्या मोकळ्या जागेत उलटला. यामध्ये ट्रक चालक फारुख जमादार हे जागीच ठार झाले. तर क्लिनर कामरान कलादगी (वय २४, रा. बागलकोट, कर्नाटक) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक उलटला तेथे दोन बैल चरत होते. ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैल जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळतातच हातखंबा येथील महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.