
खेड : काल अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानाच्या अपघातात दुर्दैवाने एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या मंडणगड तालुक्यातील बुरी गावच्या रोशनी राजेंद्र सोनघरे (वय अंदाजे २४) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कोकणवासीयांच्या मनाला चटका लागला आहे.
ही बातमी समजताच आमदार योगेशदादा कदम यांनी शोक व्यक्त करताना म्हटलं की, “या घटनेने मन सुन्न झाले आहे. एवढ्या लहान वयात, स्वप्नांचा पाठपुरावा करत असताना झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण प्रसंगी मी सोनघरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.”
“भावपूर्ण श्रद्धांजली…!” अशा शब्दांत आमदार कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या अपघाताची चौकशी सुरु असून मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन संबंधित विमान कंपनीने दिले आहे.
रोशनी सोनघरे यांच्या निधनामुळे बुरी गावात शोककळा पसरली आहे.