श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर- धामणी- संगमेश्वर तालुक्यातील माखजन धामापूर मार्गावर पेढांबे स्टॉप नजीक रस्त्यावर झाड व माती घसरून आल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे मागील दोन दिवसांपासून हे झाड तसेच असून अद्यापही बांधकाम विभागाचे कुणीही फिरकले नसल्याने ग्रामस्थासह वाहन धारकामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . हा रस्ता रत्नागिरी व गणपतीपुळे कडे जाणारा जवळचा मार्ग असल्याने सतत ची रहदारी असते .तसेच शालेय विद्यार्थी ये जा करत असतात.
हे झाड वळण मार्गावरच असल्याने समोरून येणारे वाहन तात्काळ दिसत नसल्याने ते ताबडतोब बाजूला करणे गरजेचे आहे .मात्र आज ही तसेच रस्त्यावर पडून राहिल्याने प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे .बांधकाम विभागाने लवकरात लवकर हे झाड बाजूला करून रस्ता रहदारीस सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्था सह वाहन धारका मधुन होत आहे.