
डोंबिवली- डोंबिवली आदिनाथनगरमधील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेनं दिली होती. घटना स्थळावर अग्निशमन दल दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू आहे. ही घटना अहिरे रोड परिसरात घडली आहे.
कोसळलेल्या इमारतीचे नाव आदि नारायण होते. आदी नारायण इमारत ही धोकादायक होती. काल संध्याकाळच्या सुमारास इमारतीला तडे गेले होते. महापालिकेने इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती. नोटीस महापालिकेने बजावल्याने आज सकाळपासूनच इमारतीतील रुम रिकाम्या करण्याचे काम सुरू होते. बहुतांश जणांनी आपल्या रुम खाली केल्या होत्या, पण दोघेजण त्याठिकाणी वास्तव करीत असल्याचे सांगितले जात आहे. आज सायंकाळी ५ वाजता अचानक ही इमारत कोसळली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.