दिव्यात घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट; चौथ्या मजल्यावर भडका

Spread the love

ठाणे : निलेश घाग दिव्यातील पुर्वेला साबे गावात डी. जे. कॉम्प्लेक्स येथील एका इमारतीच्या चौथा मजल्यावरील घरात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिलेंडर स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की या दुर्घटनेत दोघं होरपळले. शांतीलाल मोहन सोलंकी (वय ४५) आणि प्रेरणा श्रीराम लांबे (वय ४०) असे महिला आणि पुरुषाचे नाव आहे जे १०० टक्के भाजले आहेत

जखमींना पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

बुधवारी साडे नऊ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार साबे-गाव, दिवा (पूर्व) ठाणे या ठिकाणी सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रूम नं. ४०२ मध्ये सिलिंडरची गळती झाल्याने भडका उडून आग लागली होती. सदर घटनास्थळी पोलीस कर्मचारी, टोरंट कंपनीचे कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १- पिक-अप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान १- फायर वाहन,व खाजगी १- रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले. सदर घटनास्थळी रूम मध्ये लागलेली आग सव्वा-दहा वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविण्यात आली.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page