समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात,बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Spread the love


समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अंदाजे 33 प्रवाशी प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात बसचे टायर फुटले.

व्हिडिओ पहा सविस्तर

टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायरला धडकली. अपघातानंतर बसने क्षणात पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. बसमध्ये अडकून पडल्याने 25 प्रवाशांचा कोळसा झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेस आहे. सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page