डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात इंग्लंडमधील पंधरा डॉक्टरांचा चमू दाखल
सावर्डे : (प्रतिनिधी) डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात इंग्लंडमधील पंधरा डॉक्टरांचा चमू दाखल झाला आहे. त्याच्याकडून येथील वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि समर्थ नर्सिंग स्कूलमधील विद्यार्थी तसेच रूग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण घेत आहेत. पाश्चिमात्य देशात कशाप्रकारे रूग्णांना सेवा दिली जाते, अत्याधुनिक उपचार कसे दिले जातात, याचे विशेष मार्गदर्शन येथील डॉक्टर व विद्यार्थ्यांना दिले जात आहे.
इंग्लंडमधील या १५ डॉक्टरांकडून १० दिवसांच्या मुक्कामात गरजू रूग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. त्याचबरोबर डेरवण येथे शिक्षण घेणारे डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. स्थानिक पातळीवर तयार होणारे डॉक्टर, परिचारिका यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण याठिकाणी देण्याचा हा प्रयत्न आहे. या टीमचे प्रमुख डॉ. संजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १५ वर्षाहून अधिक काळ वालावलकर रूग्णालयात इंग्लंडमधील डॉक्टरांचा चमू येथे आरोग्यसेवा देत आहे.