संगमेश्वर- डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवन याच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी बळीराजा संघ माखजन येथे दाखल झाला आहे .महाविद्यालयाचे विद्यार्थी कायमस्वरूपी शेतकऱ्यांसोबत राहून कृषी विभागात सहकार्य करत आहेत, तसेच युवकांना व शेतकऱ्यांना शेतीचे व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देत आहेत. असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी माखजन गावातील शेतकरी गंगाराम हेमन, संपदा हेमन, ममता हरेकर, अक्षता हेमन, सुजाता हेमन, स्वरूप हेमन उपस्थित होते व बळीराजा संघाचे विद्यार्थी ओमकार सत्रे, हर्षद कांजर, अभय जाधव ,साहिल कुंभार ,यश पांचाळ, प्रथमेश खिलारे ,रोहन गावडे ,अथर्व कदम ,ओमकार राणे, विनय बैरी ,यश गांगोडे आणि आर्य राणे आदी उपस्थित होते.