नेरळमधील अतिक्रमण घरे कायम करण्यासाठी भगवान चंचे यांचा पुढाकर; सुनील तटकरे यांना दिले निवेदन…..

Spread the love

नेरळ- सुमित सुनिल क्षीरसागर  नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत नेरळ शहरातील चिंचआळी परिसरातील अतिक्रमणात असलेली घरे कायम करण्याबाबतचे निवेदन येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. कर्जत तहसील कार्यालयाकडून नेरळ चिंचआळी परिसरातील 68 घरे गुरुचरण जागेत बांधली असल्याने ही घरे अतिक्रमण निर्देशित असल्याचे नोटीस देण्यात आली होती. यानुसार येथील ग्रामस्थांची या जागेवरील घरे ही कायम करण्यात यावी या मागणीचे पत्रक खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

कर्जत कल्याण राज्यमार्गाला लागून असणाऱ्या चिंचआळी हा परिसर नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्ह नंबर 151 मध्ये गुरुचरण जागेवर वसलेले आहे. या गुरचरण जागेवर 68 घरांना अतिक्रमण ठरवून कर्जत तहसिलदार कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.ही घरे लवकरात लवकर हटविण्यात यावी असे निर्देश तहसील कार्यालयाने या कुटुंबांना दिले आहे. मात्र येथील कुटुंबाची वस्ती गेले ४० ते ५० वर्षापासुनचे आहे. येथील कुटुंब त्याप्रमाणे नेरळ ग्रामपंचायतीला कर, घरपट्टी, पाणी बिल,वीज बिल त्याच बरोबर तहसील कार्यलयाकडून दंडात्मक लावलेले बिल देखील येथील ग्रामस्थांनी महसूल विभागाला भरलेले आहे. परंतु आता येथील ग्रामस्थाना घरे पुन्हा हटवण्याच्या नोटीसा प्राप्त झाल्याने येतील ग्रामस्थ भूमिहीन होवून रस्त्यावर येणार असल्याने संकटात सापडले आहेत.
अनेक वर्षाचा संसार येथील ग्रामस्थांचा हा डोळ्यासमोर मोडला जाणार असल्याने नेरळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहिलेले तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष असलेले भगवान चंचे हे ग्रामस्थांसाठी धावून आले आहेत. या गावकऱ्यांना कायमस्वरूपी याच जागेवर ठेवण्यात यावे यासाठी खासदार सुनील तटकरे यांची नुकताच चंचे यांनी भेट घेतली आहे. 

अलिबाग येथे झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत त्यांनी चिंचआळी येथील ग्रामस्थांचा प्रश्न देखील उपस्थित केला.नेरळ ग्रामपंचायतिच्या गुरुचरण जागेवरील अतिक्रमण घरे हे शासनाच्या मूल्यांकणानुसार पक्की करण्यात येवून त्यांना सनद अर्थात मालकी हक्काचा पुरावा मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले आहे. या संदर्भात खासदार तटकरे यांनी आपल्या शासनांकडून ग्रामस्थाना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ धुळे,नेरळ शहर अध्यक्ष धनाजी गरुड यांसह येथील रहिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page