
“साई आधार आश्रमातील” मुलांचे पालनकर्ता श्री.विशाल पोरुळेकर यांच्याशी १९ फेब्रुवारी रोजी अन्नधान्य देऊन चर्चा करण्यात आली होती त्यावेळी श्री.विशाल पोरुळेकर सर यांनी म्हटले होते की,पावसाळा येत आहे त्यामुळे मुलांना जुने कपड्याची व्यवस्था झाली तर उत्तम होईल त्यावेळी आपल्या संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री.संभाजी सोनू मालप यांनी संघटनेकडून आश्रमातील मुलांची गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगण्यात आले होते.
आपल्या संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री.संभाजी सोनू मालप कमिटी सदस्य आणि इतर सदस्याच्या प्रयत्ननाने ०१ मे महाराष्ट्र दिन च्या निमित्ताने विरार येथील भाताने गावातील लहान मुलांच्या साई आधार आश्रमाला भेट देऊन मुलांना कपडे,अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि प्राथमिक औषधे देऊन सहकार्य करण्यात आले.
संघटनेचे सचिव श्री. संदिप वासुदेव मांडवकर, खजिनदार कु.स्वप्निल नागले आणि इतर सदस्यांनी श्री. विशाल पोरुळेकर यांच्याशी संवाद साधला.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी ०१ महिन्यापासून मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडण्यास सहकार्य केले.कार्यक्रमाच्यावेळी संघटनेचे सदस्य श्री.राजेन्द्र म्हादये (कमिटी सदस्य),श्री.रोहित मालप,श्री.हृतिक गोताड,श्री.महेश आंबेलकर,
श्री.रमेश भुवड, कु.मंथन आंबेलकर आणि कु.
रिया म्हादये उपस्थितीत होते.
विशेष सहकार्य कु.विशाल मांडवकर (मुंबई प्रदेश संपर्क प्रमुख) यांचे लाभले.
संघटनेच्या सर्व सदस्याचे तसेच विविध स्वरूपात मदत केले अश्या सर्व दानसुर व्यक्तीचे मनःपूर्वक आभार !
श्री.संदिप वासुदेव मांडवकर सचिव