संगमेश्वर – चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे महायुतीचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार शेखर निकम यांची निवडणूकीच्या धर्तीवर नायरी मोहल्ला येथे तज्जमूल पाटणकर यांच्या प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला काही मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहणार होते मात्र प्रत्यक्षात या सभेला परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने या बैठकीचे प्रचार सभेत रूपांतर झालेले पाहायला मिळाले, येथील सर्वसामान्य ग्रामस्थ्यांचे / मतदारांचे प्रेम पाहुन आमदार निकम हे भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
नुकतीच नायरी मोहल्ला येथे 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीला सामोरी कसे जावे, नेमकी तयारी कशी करावी या साठी या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री, मज्जीद नेवरेकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, भाजपाचे उत्तर मंडळाचे अध्यक्ष विनोद म्हस्के यांनी केले होते.या साठी नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातूर्डी येथील ठराविक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे कळवण्यात आले होते.
मात्र आमदार निकम हे नायरी मोहल्ला येथे येणार असल्याचे समजताच श्री निकम यांच्या वर प्रेम करणारे सर्वसामान्य कार्यकर्त्यां सोबत महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहिले.आमदार निकम यांची गाडी बैठकीच्या ठिकाणी येताच ‘निकम सर तुम आज बढो हम तुमारे साथ है’ च्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी परिसरातील अनेकांनी निकम यांना शुभेच्छा देत ही सभा निवडणूकीच्या पुर्व नियोजनाच्या तयारीची नसुन ही विजयाची नांदी असल्याचे मत मंडण्यात आले.
या सभेला मार्गदर्शन करताना श्री, शेखर निकम यांनी आपल्या छोटेखांनी भाषणात सर्वप्रथम कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहुन समाधान व्यक्त केले त्याचवेळी आपणाकडे वेळ कमी आहे सर्वांनी सावध राहावे, घराघरात महायुतीच्या माध्यमातून झालेली कामे सर्वांपर्यंत पोचवावीत असे आदेश दिले.
आता पर्यंत अणेक कामे पुर्ण केली, काही प्रगतीपथावर आहेत तर काही कामे करायची आहेत त्या साठी आपली साथ हवी असे आवर्जून सांगताना कसबा येथील संभाजी स्मारक, प्रचित गड, कारभाटले येथील संताजी धनाजी घोरपडे यांचे स्मारक, शृंगारपूर येथील महाराणी येसूबाई यांचे स्मारक,आता पर्यंत कोठेच नसलेले चिपळूण येथे मुस्लिम मल्टी सेंटर या साठी सुमारे आठ कोटीरुपये मंजुर केले असल्याची माहिती दिली.
“संगमेश्वर तालुका हा इतिहासाची पार्श्वभूमी असलेला तालुका असुन या तालुक्यातील पर्यटन स्थळ होण्याच्या दृष्टीने आपणाला प्रयत्न करायचे आहेत, जेणे करुन बाहेरील पर्यटक येथे येतील येथील लोकांना रोजगार निर्माण होईल अशी अनेक कामे आपणास करायची आहेत त्यासाठी आपल्या साथीची आवश्यकता असल्याचे भावनिक आवाहन केले.
श्री निकम पुढे म्हणाले…
कोणी काहीही सांगेल त्या भूल थापाना बळी पडू नका, मागील वेळी संविधान बदलणार असे सांगून लोकांची, मतदारांची फसवणूक करुन सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आता निवडणूक होताच लाडकी बहीण ही योजना बंद होणार अश्या थापा मारत आहेत, पण मी आज येथे जमलेल्या माझ्या सर्व भगिनींना सांगु इच्छितो आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाहीच उलट आमचे सरकार आल्यास आता मिळणारे पंधराशे रुपयात वाढ निश्चित होईल असे आश्वासन देताना काही विरोधक या योजनेची खाल्ली उडवत असुन जेथे महिलांना आपल्या नवऱ्याचा महिन्याचा पुर्ण पगार पुरतं नाही तेथे पंधराशे रुपयाचे काय असा प्रश्न विचारत आहेत.
त्यांना मी एवढेच सांगु इच्छितो ज्या महिल्याना महिना अखेर संसाराची गाडी रूळावर आणताना नाकी नऊ येतात त्यांना पंधराशे रुपयाचे मोल श्रीमंताना काय कळणार असा टोला आमदार निकम यांनी विरोधकांना लागावला.विरोधक येऊन काही ही खोटे नाटे सांगतील, काही आमिष दाखवतील त्यांना भुलू नका येत्या वीस तारखेला घड्याळ या निशाणी समोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन निकम यांनी उपस्थिताना केले.
या सभेला नायरी, शृंगारपूर, कातूर्डी, तिवरे, कारभाटले येथील महायुतीचे बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे (अल्पसंख्यांक) जिल्हाध्यक्ष श्री, जाकीर शेकसन, नायरीच्या सरपंच श्रीम, प्रियांका चाळके, तिवरे सरपंच प्रीती गुरव, इम्रान कोंडकरी, मुक्त्यार तांबू, लियाकत नवरेकर, आसिफ धामस्कर, अकबर काका दसुरकर, शृंगारपूर माजी सरपंच वामन म्हस्के, राजा म्हस्के, सुदाम तावडे, सुजय पाले, देवेन पवार, संदेश घाडगे, तज्जमुलं पाटणकर,उद्देश मोहिते, नबील तांबू, आदिसोबत महायुतीतील परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य उपस्थित होते.