
रत्नागिरी प्रतिनिधी : खेड शिवतर मार्गावर मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला जात असताना एक रिक्षा नातवडी धरणाच्या कॅनलमध्ये कोसळली.यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.अपघात मंगळवारी 9 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुरडे शिंदेवाडी येथून जाणाऱ्या कॅनॉलमध्ये घडला.
माहितीनुसार खेडमधील एकाच कुटुंबातील काही लोक ऑटो रिक्षा मधून मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात होते. नातूवाडी धरणाच्या कॅनॉलच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या चढावर रिक्षा चढली नाही व रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा उलटी खाली येऊन थेट आठ ते दहा फूट खोल असणाऱ्या कॅनॉलमध्ये पडली.अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे कळते तर सहाजण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी जखमींना तात्काळ खेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.