डोंबिवलीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मसाज पार्लरवर छापा, हाय प्रोफाईल सोसायटीत सुरू होता शरीरविक्रीचा धंदा…

Spread the love

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतील एका हायप्रोफाईल सोसायटीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी भांडाफोड केला आहे. पथकानं या पार्लरवर धाड टाकून एका महिलेला अटक केली तर शरीरविक्रय व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका केली.

ठाणे Sex Racket Dombivli- डोंबिवलीतील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील एका हायप्रोफाईल सोसायटीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नवी मुंबईतील उलवे येथील मसाज पार्लर चालवणाऱ्या महिलेविरुध्द पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयश्री प्रमोद मुंढे असं मसाज पार्लरच्या नावानं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपी महिला दलालाचं नाव आहे.

‘या’ कारणानं आल्या शरीरविक्रय व्यवसायात….

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला दलाल ही हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या शंखेश्वर गृह संकुलात संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा नावानं मसाज पार्लर चालवत होती. या पार्लरमधून दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. या महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं शरीरविक्रय व्यवसायात उतरल्या होत्या, असं पोलीस तपासात उघडकीला आलं.

अनोळखी व्यक्तीनं दिली माहिती…

ठाणे येथील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना शुक्रवारी एका अनोळखी व्यक्तीनं संपर्क साधला. डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलाच्या एका सदनिकेत मसाज पार्लरच्या नावानं वेश्या व्यवसाय चालवला जात आहे, अशी माहिती दिली. संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा शाॅप नावानं हे पार्लर चालवलं जात होतं. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वालगुडे आणि त्यांचं पथक डोंबिवलीत संस्कृती मसाज पार्लरवर छापा टाकण्यासाठी दाखल झालं. त्यांना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ममता मुंजाळ यांचं सहकार्य मिळालं.

ग्राहकानं इशारा करताच टाकली धाड…

प्राप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून तेथे खरंच अनैतिक व्यवसाय चालतो का? याची खात्री केली. बनावट ग्राहक पोलिसांनी खुणा करून दिलेले पैसे घेऊन पार्लरमध्ये गेला. पार्लरमध्ये जाताच त्याच्याकडून दोन हजार ५०० रुपये घेण्यात आले. त्याच्या मागणीप्रमाणे शरीरसुखासाठी एक महिला त्याला उपलब्ध करून देण्यात आली. यानंतर बनावट ग्राहकानं खोलीतून पोलिसांना मोबाईलवर संपर्क करून इशारा करताच पथकानं मसाज पार्लरवर धाड टाकली. त्यावेळी तेथे दोन पीडित महिला आढळून आल्या.

मसाज पार्लरची तपासणी करण्याची मागणी…

कारवाईच्या ठिकाणी सात हजार, इतर साधने आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. मसाज पार्लर चालकानं अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्यानं पोलिसांनी मसाज पार्लर चालक जयश्री मुंढे हिच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आता डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील मसाज पार्लरची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page