आत्तापर्यंत मोबाईल, टीव्ही सारखे अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणाऱ्या शाओमी या चीनी कंपनीने इलेक्ट्रिक कार देखील सादर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या पदार्पणापूर्वीच, सोशल मीडियावर ईव्हीचे फोटो लीक झाले आहेत. या बातमीत आम्ही तुम्हाला शाओमीच्या इलेक्ट्रिक कारचे फीचर्स काय असतील, ते सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता Xiaomi कडून इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी केली जात आहे. या कारचा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला असून, हा फोटो शाओमीच्या आगामी इलेक्ट्रिक कारचा असल्याचा दावा केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Xiaomi च्या इलेक्ट्रिक कारचे नाव MS11 असू शकते. लीक झालेल्या फोटोमध्ये कारवर MS11 नेमप्लेटही दिसत आहे. कंपनीने २०२१ मध्येच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यासोबतच कंपनीने सांगितले होते की, येत्या १० वर्षांत कंपनी १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
जो फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर व्हायरल होत आहे, त्याची रचना अनेक गाड्यांपासून प्रेरित असल्याचे दिसते. पहिल्या दृष्टीक्षेपात, कार बीवायडीच्या सीलसारखी दिसते. कारमध्ये एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय ही कार ड्युअल टोन स्कीमसह दिसते. कारची रचना करताना एरोडायनॅमिक्सचीही काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे कारची रेंज चांगली असण्याची अपेक्षा आहे. याशिवाय कारच्या इतर फीचर्सची माहिती समोर आलेली नाही.