सावर्डे महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी एकच औषध तयार केले
चिपळूण : अलीकडे मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. माणसाच्या आरोग्याच्या समस्येत हे दोन आजार मोठी अडचण ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी एकच औषध तयार केले असून, या औषधाला भारत सरकारने पेटंट बहाल केले आहे.आजपर्यंत बाजारपेठेत अशाप्रकारचे दोन्ही आजारांसाठी एकच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना एकच गोळी तयार होणार असून, औषध निर्माण क्षेत्रात हे संशोधन क्रांती करणार आहे.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने कडूलिंबाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर चांगले आरोग्य लाभावे म्हणून या दिवशी कडूलिंबाचा रस घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर मुधमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी हे पेटंट लाभदायक ठरणार आहे. बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन अँड मेटफॉरमीन युसिंग नॅचरल पॉलिमर्स या संशोधन कार्यास पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे.
हेे संशोधन हे औषध निर्माण शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य असून मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे औषध एक संजीवनी ठरणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा