पीएम मोदींच्या कार्यक्रमात गार्ड म्हणून प्रवेश करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान कार्यक्रमात येण्याच्या सुमारे ९० मिनिटे आधी आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१९ जानेवारी रोजी पीएम मोदी महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एका कार्यक्रमात पोहोचले होते. मुंबई पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, पंतप्रधान येथे पोहोचण्याच्या सुमारे ९० मिनिटे आधी, गार्ड्स रेजिमेंटचा नाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने उच्च-सुरक्षा असलेल्या व्हीव्हीआयपी परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
रामेश्वर मिश्रा (३५) असे आरोपीचे नाव असून, तो विज्ञानाचा पदवीधर आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्याला संशयावरून दुपारी ३ वाजता थांबवले, त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७१, ४६५, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी (२० जानेवारी) वांद्रे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.