▪️गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये पोलिसांनी 800 कोटींच्या ड्रग्जवर मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील गांधीधाम येथे कोट्यावधी रूपायांची बेकायदेशीर औषधे सापडली आहेत. ही औषधे समुद्र किनाऱ्यावर टाकून देण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती कळताच त्यांनी याचा तपास सुरू केला.
▪️या करवाईनंतर गुजरातचे गृहराज्यमंत्री संघवी यांनी या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक केले आहे. या औषधांची तपासणी केल्यानंतर ते कोकेन असल्याचं निष्पन्न झालं आहे. गांधीधाम येथे समुद्रकिनारी ही तब्बल 80 पाकीटं सापडली होती. त्याचे प्रत्येकी वजन सुमारे 1 किलो आहे. या औषधं प्रकरणी पोलिसांना संशय होता. मात्र काईवाई होण्याच्या भीतीने या तस्करांनी हे अंमली पदार्थ समुद्र किनारी टाकून दिले.
▪️या प्रकरणाची माहिती कच्छ जिल्ह्यांचे पूर्व विभागाचे एसपी सागर बागमार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या अंमली पदार्थांच्या पाकिटांच्या किंमत अंदाजे सुमारे 800 कोटींपेक्षा जास्त असू शकते. त्यानंतर पोलिसांनी या तस्करांना पकडण्यासाठी कसून तपास केला. मात्र अद्याप यातील कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र पोलिस या ठिकाणावर लक्ष ठेवून आहेत.
▪️या कारवाईबद्दल बोलताना गुजरातचे गृहराज्यमंत्री संघवी यांनी देखील ही माहिती दिली की, गांधीधाम पोलिसांनी 80 किलो कोकेन जप्त केलं. या अंमलली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 800 कोटींपेक्षा जास्त असू शकते. तर ही कारवाई यशस्वी केल्याबेद्दल डीसीपी आणि गांधीधाम पोलिसांचं अभिनंदन.