
*मुंबई:-* मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत ही वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. तर विभाभज , विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी 100 रुपयांची रक्कम ही 300 रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे.