
*चिपळूण (प्रतिनिधी) :* रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे… चिपळूणमधील एक प्रभावशाली नेता, यशस्वी उद्योजक लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार! सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, मुंबईत भाजपच्या कार्यालयात आज बुधवारी सकाळी आठ वाजता या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला या नेत्यांसह राज्याचे मंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी आमदार डॉ. विनय नातू हे स्वतः उपस्थित होते. चर्चेला गुप्ततेचे वलय असले तरी या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्याच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरवण्यात आला असून १९ ऑगस्ट रोजी भाजप प्रवेशाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते, अशा स्थितीत या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश पक्षासाठी राजकीय दृष्ट्या मोठा फायदेशीर ठरणार असल्याचे विश्लेषण सुरू झाले आहे.

विशेष म्हणजे, या प्रवेशामुळे महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चिपळूणमध्ये गेल्या काही काळात राजकीय समीकरणे बदलत असतानाच भाजपने या मोठ्या नेत्याला आपल्या गोटात खेचत महत्त्वाचा डाव टाकला आहे, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. यापुढील काळात या नेत्याची अधिकृत घोषणा, पक्षप्रवेश सोहळा आणि त्याचे संभाव्य परिणाम याकडे जिल्हाभराचे लक्ष लागून राहिले आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर