चुनाकोळवण मधील नमन कलेचा वारसा जपणारा कलाकार अनेक वर्षे हवालदार ची भूमिका साकारणारा कलावंत श्री पांडुरंग यशवंत बापर्डेकर रसिकांचा पांडू हवालदार यांना नमन लोककलेचा पुरस्कार जाहीर….
संगमेश्वर: जेष्ठ नमन कलावंत श्री पांडुरंग यशवंत बापर्डेकर चुनाकोळवण सुतारवाडी यांना नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड भारत संस्थेच्यावतीने लोककला गौरव पुरस्कार सन २०२३ घोषित झाला असून त्याबद्दल त्यांच मुंबई ते ग्रामीण पातळीवर आजूबाजूच्या परिसरात अभिनंदन केलं जात असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पांडूरंग बापर्डेकर यांनी वयाच्या १२ वर्षा पासून नमन या लोककलेत कलावंत, वादक व गायक अशा तिहेरी भुमीकेत आपली कामगिरी आपल्या स्थानिक मंडळातून करत असत. आज वयाच्या ५७ व्या वर्षी सुद्धा नमन या लोककलेत कलाकार म्हणून अनेक भूमिका साकारत आहेत,
पूर्वी च्या काळात कोणतेही साधन नसताना वाहन किंवा अन्य गोष्टी उदा.वीज,संगीत,या अनेक साधने नसताना ही इतर गावात चालत जाऊन रात्रीच्या वेळी फक्त (गॅस ची बत्ती ) वर फक्त 50 किंवा 100 रु.सुपारी वर आपली नमन ही कला सादर करायचे,, ती मज्जा एक वेगळीच,,,आता कालानुरूप बद्दल झाला आहे,
नमन आणि जाकडी,ताष्याची काठी मारणे अश्या कला आज पर्यँत जोपासत आहेत,,
नमन या कलेमध्ये काम करताना त्यांनी हवालदार ही प्रमुख विनोदी भूमिका अनेक वेळा साकारली. त्यामुळे ते आजूबाजूच्या गावात, विभागात पांडू हवालदार म्हणून प्रसिद्ध होते. त्याच बरोबर त्यांना वादनाचा ही मोठा छंद असून डपावरची गाणी अश्या सर्व क्षेत्रामध्ये कलाकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविलाआहे. आज बरीच नमन या लोककलेसाठी लागणारी साधन सामुग्री त्याची व्यक्तिगत सामुग्री म्हणून त्यांच्या घरात कायम स्वरूपी ठेवलेली आहे.
आज पर्यंत त्यांनी गावच्या, वाडीच्या, त्याच बरोबर मुंबादेवी नमन मंडळ मुंबई व आई जीवदानी नाट्य नमन मंडळ विरार या नमन मंडळां मध्ये कलाकार म्हणून कार्यरत होते सद्या ते आई जीवदानी नाट्य नमन मंडळ विरार या मुंबईस्थित सुप्रसिद्ध कलामंचा मधे कार्यरत आहेत.
नमन या लोककलेतून गावचा, वाडीचा नावलौकीक व्हावा ही त्यांची प्रामाणिक मनापासून इच्छा. आपल्या योगदानातून अनेक कलाकार घडून ते कलाकार आज मोठ्या मंचावर कलाकार म्हणून नावलौकिक करून आहेत. त्यांच्या घरातील त्यांचा हा वारसा सर्व सहकुटुंब आज नमन कलाकार म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयां मधे तीन भाऊ व त्यांची मुले असे एकून ८ कलावंत एकाच घरात आहेत. हीच खरं तर लोककलावंत सन्मा. श्री पांडुरंग यशवंत बापर्डेकर यांची या लोककले प्रतीची निष्ठा होय.
आज त्यांना नमन लोककला संस्था यांच्या वतीने घोषीत झालेला पुरस्कार पहाता. सदरचा पुरस्कार हा खरोखर योग्य कलावंताला मिळत आहे याचं सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. सदरचा सन्मान सोहळा रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता स्थळ – साहित्य संघ मंदिर गिरगाव मुंबई – ४ येथे आयोजित केला आहे. आपण सर्वांनी सदर कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे. सदर कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.,