खेड:- तालुक्यातील धामणदेवी येथील हाउसिंग कॉलनीमधील सह्याद्री इमारतीतील एक सदनिका चोरट्यांनी फोडून सुमारे २ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांसह इतर ऐवज चोरून नेला. ही घटना १२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघड झाली. याची नोंद पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती, फिर्यादी हे त्यांच्या कंपनीच्या कामानिमित्त (जि. भरूच, राज्य गुजरात) येथे गेले होते. दरम्यान, चोरट्याने दरवाजाचे लॅचचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्याने २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, तसेच चांदीचे ४ पैंजण जोड व देवपूजेकरिता लागणाऱ्या चांदीच्या वस्तू चोरी करून नेल्या. यामध्ये २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ३ छोटे फूलपात्र, १ ताट, ३ छोट्या वाट्या, १ पूजेचा तांब्या, १ ग्लास, १ छोटी पळी-पंचपात्र अंदाजे एकूण वजन १२०० ग्रॅम. ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे ४ पैंजण जोड असा २ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला.