दिवा (प्रतिनिधी) गेल्यावर्षी कोरोनामुळे तर यावर्षी माजी नगरसेवक दिपक जाधव यांच्या कुटूंबावर ओढवलेली दुखद घटना यामुळे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांचा यावर्षीही आपला वाढदिवस साधेपणाने केला.त्यांनी सर्व आपल्या पदाधिकारी,जनता आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमीत्त कोणतेही पुप्षगुच्छ,होर्डींग व शुभेच्छा न देण्याची विनंती केली होती.दरम्यान त्यांचा या दिवसाचे औचित्य साधून दिव्यातील दुर्गा नगर येथील शाखाप्रमुख मनोज खंडागळे आणि श्री भुषण पाटील यांनी नागरिकांसाठी आरोग्य शिबीराचे मोठे आयोजन केले होते.या शिबीराला उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.
गेली तीन वर्षे कोरोनामुळे आणि या वर्षी आपल्या नगरसेवकांच्या कुटूंबियांवर पडलेली शोककळा लक्षात घेवून यावर्षीही नागरिकांना माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही.तसे श्री मढवी यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहनही केले होते.मात्र या त्यांच्या वाढदिवसानिमीत्त दिव्यातील दातिवली येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराला 200 पेक्षा जास्त नागरिकांच्या आरोग्य तपासण्या यावेळी करण्यात आल्या.यात हिमोग्लोबीन तपासणी,शुगर,थायराँईड,ब्लड प्रेशर,चष्मावाटप,सोनोग्राफी,एक्स्रे,ईसीजी तपासणी,हाडांचे विकार,महिला व मुलांचे सर्व विकार यावर तपासण्या करण्यात आल्या.
या शिबीरात लहान मुलांना वह्यांचे वाटप, लंच बाँक्स आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी दुर्गानगर येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.