पनवेलजवळ मालगाडी रूळावरून घसरली; वाहतुक विस्कळीत
पनवेल- पनवेल-वसई रेल्वे मार्गावर पनवेल- कळंबोली रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडी घसरली आहे. मालगाडीचे ४ वॅगन आणि ब्रेकव्हॅन रूळावरून घसरले आहेत. ही मालगाडी वसईकडे निघाली होती. मालगाडी रुळावरुन घसरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वेचे डबे बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रुळावर घसरेले डबे बाजूला हटवल्यानंतरच या मार्गावरची वाहतूक सुरळीत होईल. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे खोळंबल्या आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पनवेलहून वसईकडे जाणाऱ्या अप मार्गावर मालगाडीचे ४ वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरले. ज्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे वाहतुक सुरळीत करण्यासाठी कल्याण आणि कुर्ला येथून रिलीफ ट्रेन आणि पनवेल येथून रोड एआरटी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून दिवाकडे जाणाऱ्या अप मार्गावर हा अपघात झाला. तर डाऊन लाईन (दिवा ते पनवेल) सुरक्षित आहे. अपघातात या मालगाडीचे चार डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अपघात झालेल्या मालगाडीच्या रुळावरून हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.
अपघातामुळे या गाड्या थांबवण्यात आल्या
डाऊन ट्रेन
१५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस- कळंबोली येथे थांबली
१२६१९ एलटीटी- मंगळुरु एक्सप्रेस- ठाण्यात थांबली
०९००९ मुंबई सेंट्रल-सावंतवाडी एक्स्प्रेस- तळोजा पंचानंद येथे थांबली
अप ट्रेन
२०९३१ कोचुवेली-इंदूर एक्सप्रेस- सोमठाणा येथे थांबली
१२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस-सोमठाणा येथे थांबली