*संगमेश्वर(प्रतिनिधी) :* संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस या गावी महावितरण विभागाचा अक्षरशः भोंगळ कारभार सुरू आहेत्यामुळे येथील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. ऐन गणपतीच्या सणात रात्रंदिवस वीज जात असल्याने नागरिकां कडून महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. गावात विज का नाही हे बघायला अधिकाऱ्यांना वेळ नसतो मात्र नागरिकांनी चार दिवस वीज बिल उशिरा भरले तर लगेच त्यांचे अधिकारी मीटर कापायला येतात हा दुर्दैवी प्रकार पाहायला मिळत आहे.आणि याची दखल घेत फुणगुस येथील सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे संगमेश्वर तालुक्याचे कार्यकर्ते श्री.सुभाष लांजेकर यांनी या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती देऊन या बद्दल समज दिली मात्र मी आताच चार्ज घेतलाय वैगेरे अशी थातूर मातुर कारणे श्री. लांजेकर यांना दिली गेली.आणि म्हणूनच येत्या तीन सप्टेंबर रोजी श्री. लांजेकर या संदर्भात महावितरणच्या या कारभाराबद्दल ग्रामसभेत आवाज उठवणार आहेत.या संबधीत अधिकारी यांना देखील ग्रांमसभेत उपस्थित करण्यासाठी ग्रामसेवक यांना फोन करून सुचना दिल्या आहेत.