मंडणगड : मंडणगड शहरातील आशापुरा स्वीटस् काॅर्नर बेकरीला आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. ही आग शाॅर्टसर्किटने लागल्याचा अंदाज असून, या आगीत १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.घटना काल, शुक्रवारी (दि.१७) मध्यरात्री १:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. आगीमुळे शहरात आगीचे तांडव पाहायला मिळाले.
मंडणगड शहरातील मुख्य चौकातील व शासकीय धान्य गोदामाच्या नजीक जिवाराम चाैधरी यांच्या मालकीची आशापुरा बेकरी आहे