नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाला चावला विंचू

Spread the love

नागपूर- नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच क्रू मेंबरने तत्काळ मुंबई विमानतळ प्राधिकरणाला याची माहिती दिली, त्यामुळे या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या महिलेची प्रकृती ठीक झाल्यानंतर तिला घरी देखील सोडण्यात आले. ही घटना २३ एप्रिलची आहे. एअर इंडियाने याप्रकरणी निवेदन जारी केले आहे.

ही महिला प्रवाशी नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI630 मध्ये चढली. महिला सीटवर बसताच एका विंचवाने तिला दंश केला. महिलेने तातडीने विमानातील क्रू मेंबरला याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच मुंबई विमानतळावर ही माहिती देण्यात आली आणि डॉक्टरांना तातडीने तयार राहण्यास सांगण्यात आले. फ्लाइट लँड होताच महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आल्यानंतर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच एअर इंडियाच्या अभियांत्रिकी पथकाने विमानाची कसून तपासणी करून विंचवाला पकडले.

त्याचवेळी एअर इंडियाने याप्रकरणी एक निवेदन जारी करून खेद व्यक्त केला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रवासी महिलेने उतरताच विमानतळावरील डॉक्टरांनी तिला पाहिले आणि नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. आमचे अधिकारी प्रवासी महिलेसोबत रुग्णालयात आले आणि डिस्चार्ज होईपर्यंत या महिलेला शक्य ती सर्व मदत केली. आमच्या टीमने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमानाची सखोल तपासणी केली. त्या नंतर महिलेला चावलेला तो विंचू सापडला. पुढे योग्य ती प्रक्रिया करण्यात आली. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे एअर इंडियाने पुढे म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page