दापोली : दापोली तालुक्यातील लाडघर येथे झगडेवाडी ते दवंडेवाडी परिसरात लागलेल्या वणवा विझवताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरात हा वणवा लागला होता.
अनिल झगडे असं होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. अनिल झगडे हे बागेत काम करत असताना वनव्याची आग भडकत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. मात्र आगीमुळे आपल्या आपल्या आवारातील झाडांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलं
ते वणवा विझवण्यासाठी म्हणून धावपळ करू लागले. मात्र या वणव्याच्या आगीत अनिल झगडे पडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला