
Instagaram account वर प्राजक्तानि शेअर केला व्हिडिओ…
कर्जत: सुमित क्षीरसागर
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम येत्या सोमवारपासून (१४ ऑगस्ट) पुन्हा एकदा सुरू होत आहे. हास्यजत्रेतील सर्व मंडळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्यापूर्वी एक दिवसाची सुट्टी या मंडळींनी एन्जॉय केली आणि तेही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ लाडक्या होस्टच्या फार्म हाऊसवर. प्राजक्ता माळीच्या फार्म हाऊसवर MHJ टीममधील मंडळी पोहोचली होती. अभिनेत्रीने स्वत: एक व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी रविवार कसा एन्जॉय केला याविषयी तिने सांगितले.


‘प्रत्येक रविवार असाच असला पाहिजे’, असं कॅप्शन देत प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. प्राजक्ताच्या कर्जत याठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊसवर या मंडळींनी पूल टाइम एन्जॉय केला. या व्हिडिओत रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदळकर, रोहित माने, प्रभाकर मोरे ही मंडळी दिसत आहेत. हास्यजत्रेच्या चमूतील इतरही काही क्रू मेंबर्स यावेळी प्राजक्ताच्या फार्म हाऊसवर पोहोचले आहेत. ऑनस्क्रिन या लोकांची मजामस्ती तर लोकांना आवडतेच, पण त्याबरोबरच त्यांचं ऑफस्क्रिन बाँडिंग पाहून प्रेक्षकही सुखावले आहेत. अनेकांनी त्यांच्या मैत्रीचं कौतुक केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
कुटुंबाला दिला वेळ
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या कुटुंबासोबत या फार्म हाऊसवर वेळ घालवला होता. विकेंड घालवण्यासाठी प्राजक्ता तिच्या कुटुंबासह हक्काच्या फार्म हाऊसवर गेली होती. त्यावेळी प्राजक्ताने काही पोस्ट शेअर केले होते. यामध्ये ती आणि तिचं संपूर्ण कुटुंब दिसत असून या फोटोत प्राजक्ता अक्षरशः लहान मुलांप्रमाणे झऱ्याच्या पाण्यात झोपली आहे. एका व्हिडिओमध्ये तर ती पाण्यामध्ये खेळताना दिसतेय. तिच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील छोटी मुलंही आहेत. फार्म हाऊसमधील तिचे हे फोटो विशेष चर्चेत आलेले.