एक दिवसाआधी दिले पिस्तूल अन् अ‍ॅडव्हान्स पेमेंट! पंजाबच्या जेलमध्ये शिजला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट!…

Spread the love

बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचं निष्पन्न झालं आहे. या साठी सुपारी दिल्याचं देखील उघड झालं आहे.

माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचं उघडं झालं असून ही सुपारी बिश्नोई गँगने घेतल्याचे उघडं झालं आहे. बिश्नोई गँगच्या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. तर मार्गदर्शन करणाऱ्या चौथ्या आरोपीचा शोध देखील पोलिस घेत आहे. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की पंजाबमधील तुरुंगात असतांना त्यांनी हत्येचा कट रचला. यावेळी त्यांची बिश्नोई गँगशी ओळख झाली.

अडीच लाख रुपयांत घेतली सुपारी
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांना ठार मारण्यासाठी ४ आरोपींनी सुपारी घेतली होती. यातील ३ आरोपी हे पंजाबमधील एका तुरुंगात होते. या ठिकाणी त्यांची बिश्नोई गँगच्या शूटर्सची ओळख झाली. यानंतर त्यांनी बिश्नोई गैंगमध्ये सामील होत, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी ठेतली. तब्बल अडीच लाख रुपयांची सुपारी त्यांनी घेतली.

*असा रचला कट..*

बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यावर सुपारीची रक्कम आरोपी ही वाटून घेणार होते. मात्र, त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी तब्बल महिनाभर बाबा सिद्दिकी यांच्यावर पाळत ठेवली. या साठी त्यांनी कुर्ला परिसरात भाड्याने घर देखील घेतलं. या साठी ते १४ हजार रुपये भाडं देत होते.

*बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी शूटर्सना एडवान्स पेमेंट…*

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी मुख्य सूत्रधाराने शूटर्सना एडवान्स पेमेंट दिले. त्यांना नेमके किती पैसे देण्यात आले. हत्या करण्यासाठी नेमके किती पैसे घेण्यात आले याची माहिती अद्याप पुढे आली नाही. शूटर्सना एक दिवसाआधी आर्म्स डीलरमार्फत कुरिअर एजंटच्या मदतीने पिस्तूल मिळालं. या साठी त्यांना पैसे आधीच देण्यात आलं होतं. बाबा सिद्दिकी यांना मारण्यासाठी त्यांनी या पूर्वी प्रयत्न केला. मात्र, शनिवारी दसऱ्याच्या दिवशी त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली.

*एक आरोपई १९ वर्षांचा तर दूसरा २३ वर्षांचा..*

बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला. यातील एक आरोपी सध्या फरार आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींची नावे समोर आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकाचे वय अवघे १९ वर्षे आहे. त्याने नुकतेच गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकले आणि बाबा सिद्दीकीवर गोळी झाडली. बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला. यातील एक आरोपी सध्या फरार आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींची नावे समोर आली आहेत. गुरमेल बलजीत सिंग असे पहिल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे वय अवघे २३ वर्षे आहे. तो मूळचा हरयाणाचा रहिवासी आहे. धरमराज कश्यप असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याचे वय अवघे १९ वर्षे आहे. पोलिस दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत.

*हल्ल्याचा कट कोणी रचला?..*

बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी राज्यासह राज्याबाहेर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. परंतु या तीन आरोपींव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथा आरोपी तीन शूटर्सना मार्गदर्शन करत होता. पण चौथा आरोपी कोण? याबाबत अद्याप पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी निर्मल नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३ (१), १०९, १२५ आणि ३ (५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ३, २५, ५ व २७ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page