
रत्नागिरी : प्रादेशिक मनोरुग्णालयात मारहाण प्रकरणी शहर पोलीस स्थानकात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ जून रोजी ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये २३ वर्षीय एक मनोरुग्ण जखमी झाला आहे. शरीफ नामक व्यक्तीने याबाबतची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली असून त्यांचा मुलगा हा २३ वर्षाचा असून तो मनोरुग्णालयात दाखल होता. मात्र कोणीतरी त्यांच्या मुलाला मारहाण केली असून त्याला उपचारासाठी प्रथम जिल्हा रुग्णालय व नंतर डेरवण येथे दाखल केले असून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.