रत्नागिरी शहरा नजीक मिरजोळे येथे गांजा बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…

Spread the love

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे येथील नाचणकर चाळ येथे गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शनिवार १० मे रोजी रात्री ८.१५ वा. करण्यात आली. त्याच्याकडून ७ हजार २०० रुपयांचा १५७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सचिन राजाराम म्हापूस्कर (४०, रा. गवळीवाडा आपकरेचाळ, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल योगेश नार्वेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री संशयित हा नाचणकर चाळ येथे आपल्या ताब्यात गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एनडीपीएस अॅक्ट ८ (क), २० (ब) (२) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page