
रत्नागिरी : शहरातील परटवणे येथे गांजा ओढताना तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित राजेंद्र चव्हाण (३५, मूळ रा. आंबेशेत न्हावीवाडी, सध्या रा. कालिकानगर, मिरजोळे, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी रोहित चव्हाण परटवणे येथे बंद टपरीच्या आडोशाला काळोखात गांजा ओढत होता. त्याच्या विरोधात एन. डी. पी. एस ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.