
रत्नागिरी: लांजा पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील संशयितरित्या भटकणाऱ्या प्रौढाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र पुणाजी मणसे (वय ५२, रा. पन्हळे-मणसेवाडी, ता. लांजा) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना कुवे-गणपतीमंदिर आवार (ता. लांजा) येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा लांजा पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात होता. रविवारी (ता. ३१) संशयित रामचंद्र मणसे हा कुवे गणपतीमंदिर आवारात चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या भटकत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर