
चिपळूण ; चिपळूण तालुक्यात देखील पावसाने जोर केला आहे काही भागातून लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहेत चिपळूण व खेड परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
१. चिपळूण शहरात सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे. सध्या पाणी वाढत आहे. नाईक पूलाची पातळी ५ मी या इशारा पातळीवर पुन्हा पोहचली आहे.
२. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, ST stand, नगरपालिका कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.
३. नगरपालिका पथके ९ ठिकाणी तैनात आहेत.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडून चिपळून येथील पाहणी यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सोबत उपस्थित होते. पहा सविस्तर……
४. तलाठी, पोलीस व NDRF पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत.
६ ठिकाणे- नाईक कंपनी, ओसवाल शॅापी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र, पेठमाप
५. सध्या एका कुटुंबातील ( शिंदे) ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.
६. कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला केलेली आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे.
७. कोकण रेल्वे- कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
८. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाले आहेत.
९. मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.
१०. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेख पुलाजवळून एक गाई व एक म्हैस वशिष्ठी नदीत वाहून गेल्या आहेत.
११. जुना कॉटेज येथे पाणी पातळी वाढल्यामुळे तीन ट्रान्सफॉर्मर ( जुना कॅाटेजजवळील 2 व खडस मॅालजवळील 1) 12.30 वाजता बंद करून ठेवले आहेत. साधारणतः 250 ग्राहकाचा विद्युत पुरवठा बंद आहे.
भेंडी नका येथिल एक ट्रान्सफॉर्मर 1.20 वाजता बंद करून ठेवला आहे साधारणतः 100 ग्राहकाचा विद्युत पुरवठा बंद आहे.
१२. परशुराम घाटातील रस्ता दरड कोसळल्याने वाहतुकीकरीता बंद केलेला आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे.