
मुंबई 02 मे 2023- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यातील सदस्य निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी जाहीर केले.
यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती शरद पवारांनी गठित केली आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड.
इतर सदस्य- फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन