
कर्जत : बुद्ध पौर्णिमा निमित्ताचे औचित्य साधून अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, संघटनेच्या वतीने आज गुरुवार दिं.४ रोजी, कर्जत पासून काही अंतरावर असलेल्या बुध्द लेणी कोंडाणे लेणी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .यावेळी तालुक्याच्या पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली. त्याच बरोबर पर्यटक यांना सहज सोप्या पद्धतीने लेणी पर्यंत जाता येईल या करता संघटनेच्या माध्यमातून दिशा दाखवणारे धनुष्य बाण पांढरा चुणा यांचा वापर मोठी झाडे आहेत त्यावर लावण्यात आला आहे जेणे करुन कोणी पर्यटकाची दिशा भुल होणार नाही,या वेळी लेणीच्या आतील बाजूचा व बाहेरील परिसर, पायऱ्या स्वच्छ करण्यात आल्या, व महा पुरुषांची प्रतिमा पाण्याने स्वच्छ करण्यात आले.

या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे, महाराष्ट्र प्रदेश कामिटी अध्यक्ष रतन लोंगले. कर्जत प्रभातचे संपादक जयेश जाधव ,प्रदेश कमिटी उत्तम ठोंबरे, कर्जत तालुका सचिव प्रफुल जाधव, सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे, कु सोनल जाधव, प्राची जाधव, सोनल भगत, कू सूरज चव्हाण, तेजस सोनवणे, हर्षद चौधरी, आदी उपस्थित होते .
जाहिरात
