चिपळूण तालुक्यातील खड्पोली वसाहती लगत गुरांचा गोठा जळून खाक

Spread the love

चिपळूण :- तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीलगत लागलेल्या वणव्यात गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत विठ्ठल नारायण खरात यांचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . विठ्ठल खरात हे गाणे धनगरवाडी येथील शेतकरी आहेत . पाणीटंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी त्यांनी खडपोली येथील शौकत खडपोलकर यांच्या जागेत गोठा बांधला होता . ते या जनावरांसोबत वाड्यामध्येच राहत होते . सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खडपोली वैतरणा आणि वाशिष्ठी नदीच्या बाजूने वणवा लागला होता . या वणव्यात हा गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला . यामध्ये गोठ्यात असलेले अन्नधान्य , घरासाठीची रोख रक्कम , दागिने , म्हशींचे आंबवण , चारा , कपड्यांसह मुलांचे शैक्षणिक व मालमत्तेची कागदपत्रे जळाली .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page