
दिवा (प्रतिनिधी) काल बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास दिव्यातील सत्कार रेसिडेन्सी आणि बार येथे भरदिवसा देशी बनावटीचे पिस्तुल घेवून फिरणाऱ्या एका 27 वर्षीय इसमास मुंब्रा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणी अश्या स्वरुपात अग्नीशत्रे बाळगणे,सार्वजनिक शांतता भंग करणे किंवा त्याचे जाहीर प्रदर्शन केल्यामुळे सदर इसमावर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिव्यातील सत्कार रेसिडेन्सी आणि बार येथील परिसर गजबजलेला असतो.या ठिकाणाहुन अनेक नागरिक येजा करीत असतात.अश्या प्रसंगी काल दुपारी 3.45 च्या सुमारास येथील सार्वजनिक रोडवर सनी रामखिलाडी सिंग (वय 27) याच्याकडे पोलिसांनी झाडाझडती केल्यानंतर देशी बनावटीची एक पिस्तल आणि 2 जीवंत काडतूसे आढळून आली.अशी अग्नीशत्रे बाळगल्याप्रकरणी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या कारणास्तवर पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेवून भारतीय दंडविधान कायदा कलम -3,25 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1)(3),135 प्रमाणे मुंब्रा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास सुर्यवंशी,पोलिस निरिक्षक श्री पाटील करीत आहेत.