
खेड : महिलांना उदरनिर्वाहासाठी व्यवसाय आणि राहाण्यासाठी घर देतो असे सांगून खेडमधील गोरगरीब महिलांची २ लाख २५ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र क्रांती सेना या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष संदीप शंकर डोंगरे (रा. वारानी, जिल्हा बीड) तसेच बबन मारुती मोहिते या दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंकिता अनिल शिगवण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या संस्थेकडून खेडसह चिपळूण व जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेकडो महिलांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी असून खेडमध्ये
देखिल तक्रारदारांशिवाय अन्य महिलांची देखिल फसवणूक झाल्याच्या तक्रारी खेड पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. याबाबत सखोल तपास होण्याची मागणी महिला वर्गाकडून होत आहे. सामान्य महिलांना शिलाई मशिन, घर दुरुस्तीसाठी निधी मिळवून देतो, असे सांगण्यात आले. त्यासाठी कार्यालयीन कर्मचारी यांचा पगार, प्रवास भत्ता, महिलांकडून रक्कम गोळा करण्यात आली परंतु त्यांना काही न देता त्यांची फसवणूक करण्यात आली
जाहिरात
