दापोली – बेकायदा दारू जवळ बाळगल्याप्रकरणी दापोली पोलीसांनी २ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील विसापूर पाथरी कोंड येथे विनापरवाना देशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. पालगड पोलीस दूरक्षेत्रातील उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण व शिपाई विकास पवार यांनी १८ नोव्हेंबरला दुपारी १२.३०च्या सुमारास विसापूर पाथरी कोंड येथील एका मोकळ्या इमारतीमध्ये एकजण बॉक्स जवळ घेवून बसलेला आढळला. या बॉक्सची तपासणी केली असता त्यात १ हजार ५० रुपयांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने बॉक्स जप्त करत राजेश सखाराम बामणे (वय ४४, रा. विसापूर पाथरीकोंड) या संशयितावर कारवाई केली. दुसरा गुन्हा आंजर्ले समुद्रकिनारी घडला आहे. समुद्रकिनारी गावठी दारू जवळ बाळगल्या प्रकारणी संशयित सुभाष दत्तात्रय भाटकर (वय ७०, रा. आंजर्ले भंडारवाडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.