पुणे : पुण्यातील चांदणी चौक परिसरात रस्त्यावरू बस १५ ते २० फूट खाली कोसळून अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई ते बंगळुरू पुणे मार्गे जाणारी खासगी बस बावधन येथे मुख्य रस्त्यावरून जाताना खाली कोसळली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस बायपासवरून १५ फूट खाली कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली. या बसमधून ३५ प्रवाशी प्रवास करत होते. यातील सहा जखमी झाले आहेत. त्यांना अपघातानंतर उपचारासाठी कोथरूड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshakticha dabav.com
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा